M.I.D.C.

M.I.D.C. : MIDC acquires and develops industrial plots with all the basic amenities and make them available to needy entrepreneurs.There are three major, four mini industrial estates and three growth centres in the district.

Sr.No. Ind.estate/ Growth Center Total area hectares Developed Area Hectares No.of Plots Units working
Area Plots Allotted Available
1 Butibori Major 2428.14 1438.81 2502 2086 416 1094
2 Nagpur Major 745.83 534.98 1620 1557 63 1295
3 Kalmeshwar Major 116.76 116.76 166 164 2 112
4 Umred GC 310.12 310.12 227 215 12 27
5 Katol GC 143.92 143.92 88 87 1 22
6 Saoner GC 73.95 73.95 73 70 3 30
7 Narkhed Mini 20.59 20.59 17 16 1 2
8 Kuhi Mini 15.55 15.55 42 42 0 2
9 Bhiwapur Mini 12.68 12.68 46 28 18 1
10 Parseoni Mini 12.00 12.00 41 39 2 10
11 Nagpur I.T. 11.66 11.66 49 44 5 32

बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 1992 मध्ये नागपूरपासून 28 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर बुटीबोरी औद्योगिक वसाहतीची स्थापना केली होती. या वसाहतीअंतर्गत एकूण 2345.65 हेक्टर इतक्या जमिनीचा विकास करण्याचे निर्धारित होते. यात 16 गावांमधील खाजगी जमिनीचा समावेश आहे. या वसाहतीत 1839 औद्योगिक भूखंड तयार करण्यात आले असून, यातील 1471 भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. व्यावसायिकांना प्रेरित करण्यासाठी एमआयडीसीने 46 वर्क शेड्स उभारले आहेत.

या औद्योगिक वसाहतीला पंचतारांकित दर्जा देण्यात आलेला आहे. या वसाहतीत 20 हेक्टर जागेत आयटी पार्क, 204 हेक्टर जागेत टेक्सटाईल पार्क, 68 हेक्टर जागेत पोशाख पार्क, 147 हेक्टर जागेत विणकर पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे.

िंहगणा औद्योगिक वसाहत: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 1962 मध्ये ही वसाहत उभारली होती. नागपूरपासून 7 किलोमीटर अंतरावर ही वसाहत आहे. या ओद्योगिक वसाहतीत अनेक इंजिनीअरींग उद्योग, इलेक्ट्रिकल व्यवसायावर आधारित उद्योग, अन्नधान्यावर आधारित उद्योग आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने या वसाहतीत आपले दोन उपकेंद्रे स्थापन केली आहेत. दूरसंचार खात्याने आधीच इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजच्या माध्यमातून आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे. व्यावसायिक आणि कामगारांना येथेच पोस्ट ऑफीस, बँक, पोलिस ठाणे, पेट्रोल पम्प, कँटीन, बस सेवा आदी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. या वसाहतीत पुढील विकासासाठी आता िंकचितही जमीन उपलब्ध नाही.

सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, नागपूर: माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाला अनुकूल असे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क विकसित करण्यावर एमआयडीसीने आपले लक्ष केंद्रित केले आहे. एमआयडीसीने राज्यात 18 पेक्षा जास्त आयटी पार्क विकसित केले आहेत. यातील एक आयटी पार्क नागपुरातील परसोडी येथे आणि दुसरा आयटी पार्क सदर भागात आहे. नागपुरात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क विकसित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, संगणकाकरिता डेटा कम्युनिकेशन सुविधा, सरकारी परवान्यांकरिता िंसग िंवडो क्लिअरन्स शक्य व्हावे, हा होय. उपरोक्त टेक्नॉलॉजी पार्कमध्ये उपरोक्त सेवा देण्यासाठी विविध प्रकारची संकुले उपलब्ध आहेत.